News 
    इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कौतुकास ( English Primary & High School )

    Posted On August 02,2023

      

    भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष       2022 - 23  मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कौतुकास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता 5 वी मधील कु. समिक्षा शशिकांत पाटील या विद्यार्थिनीने 300 पैकी 230 गुण मिळवून जिल्ह्यात 227 वा तर तालुक्यात 8 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
    तसेच इयत्ता 8 वी मधील कु. भक्ती भगवंत रेठरेकर या विद्यार्थिनीने 300 पैकी 240 इतके गुण मिळवून जिल्ह्यात  11 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच चि. श्रीवर्धन महेश वड्डीकर या विद्यार्थ्यांने 300 पैकी 218 गुण मिळवून जिल्ह्यात व ७१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. 
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.