News 
    मराठी भाषा गौरव दिन ( English Primary & High School )

    Posted On February 27,2023

      

    भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूलमध्ये मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे औचित्य साधून स्कूलमध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. 27 फेब्रुवारी हा दिवस कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शाळेमध्ये कुसुमाग्रजांचे जीवन कार्य, त्यांच्या काही कविता सादर केल्या. तसेच महाराष्ट्र व मराठी भाषेचा गौरव करणारी गीते, पोवाडे, भारुडे, नाटिका, समूहगीत वासुदेव गीत इयत्ता १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्वच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व  उत्कृष्टरित्या कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमासाठी सौ. लिना वहिनी चितळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख  श्री. सुनील ऐतवडे सर तसेच १ली ते ९वी पर्यंतचे मराठी विषय शिक्षक 
    सौ. हर्षला पवार पाटील, सौ. उषा हजारे, सौ. संगीता चौगुले, सौ. सुप्रिया पवार, सौ. मनीषा तेली, सौ. सारिका पाटील व सौ. सारिका चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९वी तील विद्यार्थी चि. उदयसिंग पाटील व कु. शर्वरी जाधव यांनी केले व आभार इयत्ता ३री तील विद्यार्थिनी कु. साईशा पवार हिने मानले.