भिलवडी शिक्षण संस्था

कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा जन्म 1908 च्या सुमारास झाला वडिलांकडून त्यांना स्वदेशीचा अमोल वारसा लाभला होता पुण्याच्या मेडिकल स्कूल मधून त्यांनी आपले डॉक्टर कि चे शिक्षण पूर्ण केले होते पुढे त्या नोकरीच्या निमित्ताने काही काळ सौराष्ट्रतल्या जुनागड संस्थानात राहिल्या होत्या यावेळीच कै .डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांना सामाजिक कार्याचा प्राथमिक अनुभव मिळाला 1947 च्या डिसेंबर महिन्यात भिलवडीस आल्या येथून पुढेच खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ झाला. यापूर्वी तीन चार वर्षापासून भिलवडीत डॉक्टर म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्र चालू होते श्रीमती राधाबाई जोशी माई यांनी आरोग्य केंद्र लोकप्रिय केले होते डॉक्टर शेणोलीकर आल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता आणि लोकप्रियता अधिकच वाढू लागली परिसरातील गरजू गरीब स्त्रियांना मोफत वैद्यकीय मदत मिळू लागली या कार्याबरोबरच कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी सामाजिक व्याप्ती आणखी वाढविण्यास सुरुवात केली. अशिक्षित स्त्रियांसाठी प्रौढ शिक्षणाचे, शिवणकामाचे वर्ग सुरू केले. विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रोढ शिक्षणाचे ,शिवणकामाचे वर्ग सुरू केले. विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षणाचे वर्ग सुरू केले. स्त्रियांच्या लहान-लहान सभा परिषदा हळदीकुंकू समारंभ अशा उपक्रमातून ग्रामीण महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती केली. या आरोग्य केंद्रात अक्षरक्ष त्यांनी झटल्या प्रमाणे म्हटल्याप्रमाणे जनतेची सेवा केली. कंटाळा हा शब्द त्यांच्यापासून कायमचा दूर राहत असे या माता-बालक संगोपन केंद्रात त्यांनी केलेली समाजसेवा निरंतर स्मरणात राहील आजही आरोग्य केंद्र डॉक्टर शेणोलीकराच्या कार्याचा वारसा चालवीत आहे.

समाजमनाच्या स्वास्थासाठी आरोग्य बरोबर शिक्षण हे महत्त्वाचे आहे हे ओळखून त्यांनी शैक्षणिक सेवेतही वाहून घेतले होते 1949 मध्ये भिलवडी शिक्षण संस्थेची स्थापना झाली तेव्हा त्यांनी या समस्येचा जडणघडणीत स्वतःला झोकून दिले होते इथून पुढे तर त्यांनी शाळेचा आणि संस्थेचा संसार केला पायी वाट तुडूवून अक्षरश रुपाया रुपया देणगी म्हणून गोळा केली.शाळा मोठी झाली पाहिजे, सारी मुले इथं शिकली पाहिजेत, खेळली बागडली पाहिजेत एवढ्याच ध्यास घेऊन त्या कार्य करीत होत्या. शाळेच्या मैदानावर आज डोलणारे लिंबाची चिंचेचे झाड त्यांनीच लावली आहेत. स्वतःच्या झाडांना पाणी घातला आहे शाळेच्या मैदानावरील आड सुद्धा त्यांनी खोदला आहे.

त्यांच्याकडे कोणी पाहुणे किंवा नातेवाईक आले तर त्यांना डॉक्टर म्हणत असत मला काही देऊ नका आपणास काही मदत करायची असेल तर ती शाळेला करा शाळेच्या विकासाचा एवढा ध्यास त्यांनी घेतला होता शाळा आहे त्यांचे कुटुंब होतं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी शाळेसाठी आयुष्य खर्ची घातले शाळेच्या सर्व उपक्रमात या सहभागी होत विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये यश मिळवले तर त्यांना खूप आनंद होत असे.त्या सर्व विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे कौतुक करीत पाठीवरुन हात फिरवीत शाळेतील कोणते गरजू गरीब विद्यार्थ्यांच्या मदत करीत माजी विद्यार्थ्यांना आधार देत असेल त्यावेळी जातीपातीचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसे

डॉ. शेणोलीकराच वाचनहीअफाट होतं भिलवडी च्या सार्वजनिक वाचनालयाचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध होता मुलांना युवकांना संस्कारक्षम वाचण्याची सवय लावली पाहिजे असे त्यां नेहमी सांगत कै. डॉ. शेणोलीकर या जश्या धाडसी होत्या तश्याच त्या स्पष्टवक्ते होत्या मनाच्या मोठ्या होत्या कामाच्या ओघात एखादी चूक झाली तर प्रांजळपणे कबूल करीत होत्या त्यांच्या व्यापक समाज सेवेमुळे त्या व्यक्ती राहिल्या नव्हत्या तर एक संस्थाच बनल्या होत्या.

डॉक्टर शेनोलीकर यांना साहित्याची खूप आवड होती त्या रसिक होत्या कृष्णाकाठी औदुंबर येथे प्रतिवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या त्या आवर्जून उपस्थित राहायच्या पण त्या व्यासपीठावर कधी बसत नसत. श्रोत्यांमध्ये बसून त्या शांतपणे भाषण ऐकत मोठ्या माणसांच्या  अंगी मोठी नम्रता असते असे म्हणतात त्याचं प्रत्‍युत्तर त्यावेळी सर्वांना येत असे‌.

व्यसनाधीन लोकांबद्दल त्यांना मनस्वी चीड येईल तेव्हा त्या शाळेत येतात तेव्हा विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगत पालक सभेत पालकांनाही याबाबतीत नेहमी मार्गदर्शन करीत आयुष्याची संध्याकाळ त्यांनी तासगाव येथे काढली. शेवटपर्यंत त्या स्वावलंबी होत्या स्वतःची सर्व कामे स्वतः करीत होते तासगाव येथेही त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले होते आज भिलवडी शिक्षण संस्था सर्वत्र आदर्श संस्था म्हणून ओळखले जाते बालवाडीपासून महाविद्यालयीन शिक्षण देणारे हे ज्ञान मंदिर डॉ.शेणोलीकर यांनीच उभे केले आहे. इथल्या प्रत्येक वस्तूला आणि काणाला त्यांचा स्पर्श लाभला आहे.

भिलवडी शिक्षण संस्था आणि डॉक्टर शेनोलीकर की दोन नावे आगदी एकरुप झाली आहेत. त्यांच्या मृत्यू नंतरही त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह शाळेच्या आवारातच दफन करण्यात आला आहे म्हणून बरोबरच त्यांचे शरीर शाळेच्या मातीशी एकरुप होऊन गेलं आहे आम्हाला सदैव आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता कसा असावा आदर्श संस्था कशा उभ्या कराव्यात याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. चंद्राताई शेणोलीकर होत धवल च्या वस्त्र त्या नेहमी वापरतात .तसेच त्यांचे कार्य हि धवल आहे दूरवरून अनोळखी मुलकात येणार त्या मुलगा शेयर ग्रुप होणार विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र कार्य करणे सार कसा असामान्य आहे कै. डॉ. शेणोलीकराच जीवन असमान्य होतो मूर्ती नंतर त्यांनी आपली सारी संपत्ती भिलवडी शिक्षण संस्थेचे दान दिली निस्वार्थी सेवेच्या निष्काम कर्मयोग्याच व्रत त्यांनी अखेरपर्यंत पाळलं . कै. डॉ. शेणोलिकर यांच्या मृत्यू खूप वर्ष झाली काय धावत आहे तो होणारच आहे थांबणार नाही बरोबर समज प्रदूषण वाढत आहे वाटा अंधारात आहेत. आपणास तर वाट चालवायची आहे म्हणून अशाधूसर वाटेवर कै .डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचे कार्य सेवा त्या विचार निष्काम कर्मयोग आपणास निश्चित लख्ख उजेड दाखवील . त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचाच वसा-वारसा आपण पुढे चालविणे, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.

Mission

“Babasaheb Chitale Mahavidyalaya, Bhilawadi commits itself to promote the education of the rural mass containing cultural, social aspects of teaching & learning by encouraging employment generation.”

  • To educate students from the rural mass
  • To eduacate girls for their upliftment
  • To Provide education to the adults.
  • To avail education of different branches for creation of Social and national integrity.
  • To assist students in the development of the students.
  • To open different branches of education for the Fulfillment of the goal and objectives of the Institution.
Vision

“The true purpose of education is to cherish cultural values and unfold the inner instincts of the rural mass already swon within us; to uplift the fullest extent of the rural girls, their capacities, excellency in sphere of life with which the God has endowed us.” From the statement of Hon. Chairman Shri. P.B. Alias Nanasaheb Chitale of Bhilawadi Shikshan Sanstha, Bhilawadi at the opening of Mahavidyalaya 5th August, 1995.