भिलवडी शिक्षण संस्था

कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा जन्म 1908 च्या सुमारास झाला वडिलांकडून त्यांना स्वदेशीचा अमोल वारसा लाभला होता पुण्याच्या मेडिकल स्कूल मधून त्यांनी आपले डॉक्टर कि चे शिक्षण पूर्ण केले होते पुढे त्या नोकरीच्या निमित्ताने काही काळ सौराष्ट्रतल्या जुनागड संस्थानात राहिल्या होत्या यावेळीच कै .डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांना सामाजिक कार्याचा प्राथमिक अनुभव मिळाला 1947 च्या डिसेंबर महिन्यात भिलवडीस आल्या येथून पुढेच खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ झाला. यापूर्वी तीन चार वर्षापासून भिलवडीत डॉक्टर म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्र चालू होते श्रीमती राधाबाई जोशी माई यांनी आरोग्य केंद्र लोकप्रिय केले होते डॉक्टर शेणोलीकर आल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता आणि लोकप्रियता अधिकच वाढू लागली परिसरातील गरजू गरीब स्त्रियांना मोफत वैद्यकीय मदत मिळू लागली या कार्याबरोबरच कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी सामाजिक व्याप्ती आणखी वाढविण्यास सुरुवात केली. अशिक्षित स्त्रियांसाठी प्रौढ शिक्षणाचे, शिवणकामाचे वर्ग सुरू केले. विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रोढ शिक्षणाचे ,शिवणकामाचे वर्ग सुरू केले. विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षणाचे वर्ग सुरू केले. स्त्रियांच्या लहान-लहान सभा परिषदा हळदीकुंकू समारंभ अशा उपक्रमातून ग्रामीण महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती केली. 

Read More